Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र शशांक कुलकर्णीही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या शालेय जीवनाबाबत आणि स्वभावाच्या वैशिष्ट्यांबाबत लोकसत्ता ऑनलाईनशी चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस यांचे मित्र शशांक कुलकर्णी काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याचा खूप आनंद आहे. मी २०१४ मध्ये जो शपथविधी झाला त्यासाठीही आलो होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही शाळेत बरोबर शिकलो आहोत आणि आमचं राहणंही शेजारी शेजारीच आहे. आम्ही मागच्या ५० वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहोत. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.”

Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

देवेंद्र फडणवीस हे असे राजकारणी नाहीत जे कधी कुणाचं वाईट करतील-कुलकर्णी

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) असे राजकारणी नाहीत जे कुणाचं कधी वाईट करतील. कुणाला पाडा, कुणाला खाली खेचा असं राजकारण त्यांनी कधीही केलेलं नाही. शालेय जिवनापासूनच ते शिस्तबद्ध आयुष्य जगले आहेत. तसंच आयुष्य ते आत्ताही जगत आहेत. कधीच नाहीत जे कुणाला पाडा, कुणाला खेचा असं राजकारण करत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे यारों के यार आहेत. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) एकदम साधे सरळ राजकारणी आहेत. कुणी गोत्यात येईल असं काही ते करतच नाहीत. आम्ही एकत्र भरपूर अभ्यासही केला आहे. टवाळक्या, मजा मस्तीही केली आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं गणित कच्चं होतं त्यामुळे ११ वीत त्यांनी गणित सोडलं आणि अर्थशास्त्र हा विषय घेतला. बारावीनंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. देवेंद्र फडणवीस बॅकबेंचर वगैरे नव्हते असंही शशांक कुलकर्णींनी सांगितलं.

हे पण वाचा- “देवेंद्रजी आपल्या देशाचे ‘पहिले मराठी पंतप्रधान’ होतील”, फडणवीसांबद्दल असं कोण म्हणालं?

देवेंद्र फडणवीस आणि मी पैसे वाचवून आईसफ्रुट खायचो-कुलकर्णी

देवेंद्र फडणवीस हे काम करण्यावर प्रचंड भर द्यायचे. आम्ही शाळेत पायी जायचो कधी कधी बसने प्रवास करायचे. शाळेजवळ चुरण, आईसगोला वगैरे मिळायचा. पण पैसे नसायचे मग बसचे पैसे वाचवून आम्ही ते खायचो. देवेंद्र फडणवीस मस्तीखोरही होते. देवेंद्र फडणवीस जसे राजकारणात आले तसेतसे शांत होत गेले. मात्र आजही वेळ मागितला तर ते वेळ देतात. आम्ही अनौपचारिक गप्पा मारल्या की हसून हसून पोट दुखायला लागतं एवढे देवेंद्र फडणवीस मोकळ्या स्वभावाचे आहेत. असं शशांक कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

देेवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय आरोप तर होतातच

देवेंद्र फडणवीसांवर राजकीय आरोप होतात. पण कुणाला पाडायचं वगैरे हे देवेंद्र फडणवीसांच्या रक्तातच नाही. पक्षाने जर देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की दिल्लीला जा तर तो खुशीने जातील. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांमध्ये दम नसतो हे आम्हाला माहीत असतं. असं शशांक कुलकर्णींनी म्हटलं आहे.

Story img Loader