महाराष्ट्रात कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी करत अहमदनगरमधील राहुरी शहर आणि तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज (५ ऑगस्ट) सकाळीच या मोर्चाला सुरुवात झाली असून हजारो हिंदू नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपा आमदार नितेश राणेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. राज्यात हिंदू मुलींचं-तरुणींचं फसवून अथवा बळजबरीने धर्मांतर केलं जात असल्याचा दावा करत हिंदू संघटनांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चाबद्दल आणि कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलिकडच्या काळात राज्यात स्वतःची ओळख लपवून काहींनी मुलींशी लग्न केल्याच्या, त्यानंतर त्या मुलींचं धर्मांतर झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अशा घटना समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात सगळीकडून अशा प्रकारची (कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची) मागणी होत आहे. याप्रकरणी एक कायदा केला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी स्वतः मागच्या काळात सभागृहात घोषित केलं होतं की याप्रकरणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे कायदे आहेत, त्यानुसार आम्ही अभ्यास करत आहोत. त्याप्रमाणे आम्ही आगामी काळात महाराष्ट्रात निर्णय घेऊ.

हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…

दोन दिवसांपूर्वी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावर भाष्य केलं होतं. फडणवीस म्हणाले होते, मुलींना फूस लावून पळवून नेणे, त्यानंतर त्यांच्याशी लग्न करणे, त्यांचं धर्मातर करणे आदी तक्रारींबाबत पोलिसांनी कशा पध्दतीने कारवाई करावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून सर्व पोलीस ठाण्यांना मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली जारी केली जाईल, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री येथील धर्मातंराच्या घटनेबाबत हरिभाऊ बागडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Story img Loader