scorecardresearch

Premium

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

लोकसभा निवडणूक लढण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे.

devendra fadnavis (1)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना आणि खासदारांना विधानसभा निवडणुका लढण्यास सांगितलं असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातही असंच चित्र असल्याचं बोललं जात आहे. ज्यांना लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितलं जात आहे, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही नाव असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर आता स्वत: देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दिली.

तुम्ही दिल्लीत जाण्यास उत्सुक आहात का? की तुम्हाला महाराष्ट्रातच काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट अशी आहे की, पक्ष जेव्हा म्हणेल दिल्लीत यावं लागेल, तेव्हा दिल्लीत जाईन. ज्यादिवशी पक्ष सांगेल की मुंबईत राहायचंय. तेव्हा मुंबईत राहीन. जेव्हा पक्ष म्हणेल, आता तुझी आवश्यकता नाही, तू नागपूरला जा, तेव्हा मी नागपूरला निघून जाईल. मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. पक्षच माझ्याबद्दल निर्णय घेतो. मी स्वत: निर्णय घेत नाही. त्यामुळे माझ्या उत्सुकतेचा विषयच येत नाही.”

priyanka gandhi yashomati thakur
“प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”
sanjay raut rahul narvekar (1)
“विधानसभा अध्यक्षांची ‘टाईमपास’ वेबसीरिज चालू आहे”, राऊतांचा टोला; म्हणाले, “आमच्यावर पहिला अन्याय…!”
Manoj Jarange hunger strike
मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत? जाणून घ्या…
jitendra awhad
“विधिमंडळातील आमदारांचा गट हा पक्ष होऊ शकत नाही, कारण…”, जितेंद्र आव्हाडांचं विधान

हेही वाचा- एकनाथ शिंदेंची साथ असताना अजित पवारांना युतीत का घेतलं? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “जी पतंगबाजी चालत आहे, त्यात काहीही सत्य नाही. पक्षाने असं कुणालाही म्हटलं नाही. शेवटी राजकीय वास्तविकतेला धरून अंतिम निर्णय घेतले जातात. राजकीय वास्तविकता हीच आहे की, माझ्या पक्षाने महाराष्ट्रात माझं नेतृत्व तयार केलं आहे. त्यामुळे मी आज महाराष्ट्राचा नेता आहे. ज्यादिवशी पक्षाला वाटेल दुसरा नेता तयार करायचा आहे, तेव्हा दुसरा नेता तयार केला जाईल.

हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

“जोपर्यंत दुसरा नेता तयार केला जात नाही. तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता असेल. तसेच मी जेवढं राजकारण समजतो, त्यावरून मला वाटत नाही की मला दिल्लीत बोलावलं जाईल. त्यामुळे मी महाराष्ट्रातच काम करेन. महाराष्ट्रातलंच काम मला दिलं जाईल. महाराष्ट्रात मी पुन्हा आमचं सरकार निवडून आणेल,” असंही फडणवीस म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis on constest loksabha election from maharashtra rmm

First published on: 04-10-2023 at 19:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×