राज्यातल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आता दिसत आहे. सत्ताधारी-विरोधकांच्यात या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांचं सत्र जोरात चाललेलं दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीतले लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था त्यांनी वाईट करुन टाकली आहे, अशी टीका आज फडणवीस यांनी केली.

यासोबत त्यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील”.

sanjay raut devendra fadnavis (9)
“मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…”, संजय राऊतांची खोचक टीका
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

हेही वाचा – “बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत”.