उद्धव ठाकरेंशी असलेल्या नात्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले,….

कधीही त्यांना फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो, असंही ते म्हणाले. 

Uddhav- Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला फोन करुन त्यांना शुभेच्छा दिल्याचं सांगितलं.

राजकीय विरोधक म्हणजे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आल्याच! मात्र, त्याही पलीकडे अनेक राजकीय नेत्यांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध हे स्नेहाचे असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या संबंधांबद्दल, नात्याबद्दल आता फडणवीसांनी भाष्य केलं आहे. मी कधीही त्यांना फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो, असंही ते म्हणाले.

याविषयी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का अशी विचारणा त्यांना कऱण्यात आली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, हो, मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा- मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. गेली २५ वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र राहिलो आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांसमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Devendra fadnavis on relationship with uddhav thackeray vsk

ताज्या बातम्या