Devendra Fadnavis on Saif Ali Khan Attacked in Mumbai Home : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वर त्याच्या मुंबईतील घरात चाकू हल्ला झाल्याचा प्रकार आज (गुरूवारी) पहाटे घडला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हल्ल्याची घडला म्हणून मुंबई शहराला असुरक्षित म्हणणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील बांद्रा येथे सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सरकार आणि केंद्र सरकारवर ही हल्ला चढवला आहे.

Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray (1)
Devendra Fadnavis : “आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका!
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात मुंबई सर्वात सुरक्षित मेगा सिटी असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की, देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात. त्यांना गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण फक्त त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरिता योग्य होणार नाही कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे याकरिता सरकार नक्की प्रयत्न करेल”.

सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला

अभिनेता सैफ अली खानवर आज सकाळी त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या. त्यानंतर सैफ अली खानला तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेनंतर आप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

मुंबईतील वांद्रे येथील घरात सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, “एवढ्या सुरक्षित ठिकाणी राहणार्‍या इतक्या मोठ्या अभिनेत्यावर त्याच्याच घरात हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. नंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. जर सरकार इतक्या मोठ्या सेलिब्रिटींना सुरक्षा देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांचे काय? डबल इंजिन सरकार ना सुशासन देऊ शकते ना लोकांना सुरक्षा.”

Story img Loader