राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई केली आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी पीएफआयतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती, असेही ईडीने म्हटले आहे. दरम्यान, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. PFI कडून देशात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता PFIचा कट? ईडीने केला मोठा दावा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

PFI वर कारवाई झाली याचा अर्थ असा आहे, मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे एएनआय, एटीएस तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वी केरळ सरकारनेही PFI या संघटनेवर बंदी टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकणांचा तपास सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. PFI ची काम करण्याची पद्धत होती, त्यातून देशात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. हे एक षडयंत्र होतं, या सर्व गोष्टी बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा – Video : एकनाथ खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांना विचारताच म्हणाले…!

NIA कडून देशभरात छापे

दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील १५ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २०हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction on nia action against pfi spb
First published on: 24-09-2022 at 14:52 IST