Devendra Fadnavis on Nitin Gadkari Statement : अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो”, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केले. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची टीका होत असतानाच सत्तेतील वरीष्ठ नेत्यांनीच असं विधान केल्याने ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Ajit Pawar On Amit Shah Statement
Ajit Pawar : अमित शाहांच्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “राज्यात एका पक्षाचं सरकार सत्तेत…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण असणार? मुख्यमंत्रिपद कोणाला? शरद पवारांकडून सर्व प्रश्नांची उत्तरं
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

“उद्योजकांनी उद्योगांपासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते. तुम्ही अनुदान घ्या पण गुंतवणुकीसाठी प्रयत्न करा. शासनाच्या भरोशावर राहू नका. सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याचीही शाश्वती नाही, कारण त्यांना लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो आहे”, असं गडकरी म्हणाले होते.

नितीन गडकरींच्या या विधानामुळे विरोधकांनीही टीकास्र सोडलं. इतर योजनांचे पैसे या योजनेला वळते केल्याच्या आरोपांना यामुळे खतपाणी मिळालं आहे. वाढत्या टीकेवर अखेर देवेंद्र फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“नितीन गडकरींची ती स्टाईल आहे. ही योजना बजेटच्या बाहेरची नाही. आमच्या सर्व योजना बजेटमध्ये आहेत. पगार किंवा इतर योजनांकरता अडचण नाही. हे सर्व पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवले आहेत. आता विरोधकांच्या पोटात जोरात दुखायला लागल्याने ते रोज संभ्रम निर्माण करतात. काहीही बंद होणार नाही. सर्व चालणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

नितीन गडकरी हे राज्याच्या राजकारणात आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. ते काय बोलले हे मला माहीत नाही. पण नागपूरमधील कार्यक्रमात त्यांनी या योजनेचं कौतुक केलं होतं, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

दरम्यान, महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. जवळपास अडीच कोटी लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा महायुती सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. “जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले होते. यातच आता भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात एक विधान करत ‘गुंतवणुकदारांना अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो’, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.