विशेष न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असं दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होतं, असे निरिक्षण नोंदवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुर्ला येथील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेण्याच्या मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कटात मलिक थेट आणि हेतुपुरस्सर गुंतले होते, असे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. विशेष न्यायाधीश राहुल एन रोकडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मलिकसह डी-कंपनीच्या सदस्य हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता हडप करण्याचा गुन्हेगारी कट रचला. कोर्टाने असेही म्हटले आहे की प्रथमदर्शनी पुरावे आहेत की आरोपी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट आणि जाणूनबुजून सहभागी आहेत, म्हणून त्यांना पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोपी केले जाते. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलतान प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक मंत्रीमंडळात राहायला हवेत यासाठी सरकारची धडपड – देवेंद्र फडणवीस

“ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोन वर्षे हे सरकार इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता, ओबीसी आरक्षणाकरता कुठलीही धडपड करत नाही. मात्र त्याचवेळी डी गॅंगशी संबधित जेलमध्ये असलेले नवाब मलिक मंत्रीमंडळात राहायला हवेत यासाठी सरकारची धडपड आपण पाहतोय. याच्यापेक्षा अर्धी धडपड इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “भारतामध्ये पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्षे जी लांगुनचालणाची निती काँग्रेस पक्षाने आणली. त्यामुळे भारतात दुफळी निर्माण झाली आहे. ती दुफळी दूर करुन आपण सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत अशा प्रकारची भावना तयार करण्याचा प्रयत्न आहे. देशाला पंतप्रधान मोदी नेतृत्व देत आहे. त्यामुळे देशात मोदींच्या प्रति आकृष्ट होत आहे. त्यामुळे ही मळमळ बाहेर येत आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction to the court observation regarding nawab malik abn
First published on: 21-05-2022 at 15:59 IST