मी आयुष्यात अनेकदा राजकीय तडजोडी केल्या आहेत. पण वैयक्तिक हितसंबंधांसाठी किंवा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कधीही तडजोड केली नाही, यापुढेही करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका सोहळ्यात आमिर खानने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
लोकशाहीत बदल घडवायचा असेल तर…
लोकशाहीत बदल घडवायचा असेल तर मतदानाची टक्केवारी वाढणं गरजेचं आहे. जे लोक राजकारण्यांना शिव्या देतात त्यांच्यापैकी कुणीही मतदान करायला जात नाही. मतदानाची टक्केवारी ही जर ८० टक्के किंवा ९० टक्के इतकी झाली तर देशातल्या निवडणुका या फक्त मुद्द्यांवरच पार पडतील. अशा वेळी समोरासमोर असलेल्या उमेदवारांना मुद्द्यांवरच भाष्य करावं लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘लोकमत’ महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अभिनेता आमिर खानने घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड केली नाही, करणार नाही-देवेंद्र फडणवीस
मी माझ्या जीवनात अनेकदा तडजोडी केल्या, पण मी माझ्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी, स्वार्थासाठी कधीही तडजोड केली नाही, यापुढेही करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजकारणात तुम्ही निवडून येत असाल तर तुम्हाला हवा असलेला आदर्शवाद, बदल प्रत्यक्षात आणू शकता. मी अनेक लोक पाहिले ज्यांनी वेळेची हाक ऐकली नाही. वेळेनु सार ते स्वत:मध्ये बदल करू शकले नाहीत. त्यामुळेच ते संपून गेले, असे फडणवीस म्हणाले. तसेच मी इतिहासात मागे वळून पाहिले तर मला समजून येतं की मी ज्या विचारांना घेऊन आलो होतो, त्या विचारांना घेऊन १०० टक्के जगू शकलो नाही. मला कधी कधी तडजोड करावी लागली. माझ्या आयुष्यात मी अनेकवेळा तडजोड केली. परंतु मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी, स्वार्थासाठी मी कधीच माझ्या विचारांशी तडजोड केली नाही. मी भविष्यातही ही तडजोड करणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आमिर खानचं कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता आमिर खानचंही कौतुक केलं. तुम्ही पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तुम्ही खूप काम केले आहे. तुमच्या कामामुळे एक आदर्श निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागात तुम्ही जागृत केलेले आहे. तुम्ही त्यांना बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खानचं कौतुक केलं.
