Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी जिंकून येण्याचा दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन मविआ आणि महायुती दोहोंमध्ये बराच खल झाला. आम्ही तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा अशी खोचक टीका भाजपाने आणि महायुतीने वारंवार केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी काय फॉर्म्युला असेल ते सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून चांगला पाठिंबा मिळतो आहे. मी हे अतिआत्मविश्वासाने नाही तर अगदी मनापासून सांगतो आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही जी विकासकामं केली आणि ज्या विविध प्रकारच्या योजना आणल्या त्या योजनांमुळे आणि विकासकामांमुळे जनता आमच्या बरोबर आहे. लोकांनी महाराष्ट्रातली पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललं आणि आमचं सरकार कसं चाललं हे दोन्ही पाहिलं आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे हा माझा विश्वास आहे” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
PM Narendra Modi on Hindu Temple Attack in Canada
PM Modi on Temple Attack: कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून कडक शब्दात निषेध, म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

महाविकास आघाडीवर टीका

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीने आमच्यावर फक्त टीकाच केली आहे. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल म्हणाले, तसंच त्याविरोधात कोर्टात गेले. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आम्ही जर एखादी योजना आमच्या अर्थसंकल्पात मांडत आहोत तर त्याची आर्थिक तरतूद आम्ही करणार नाही का?” असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. तसंच महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी कुठलीही संगीत खुर्ची होणार नाही. आमचं धोरण ठरलं आहे असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!

मुख्यमंत्रिपदासाठी संगीत खुर्ची नाही

महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही संगीत खुर्चीसारखी स्पर्धा नाही. महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल? याचं एक धोरण आम्ही ठरवलं आहे. आम्ही कुणालाही कसलंही वचन दिलेलं नाही.” असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केलं.

२०१९ ची स्थिती काय होतील?

२०१९ ला ज्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या त्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले होते. तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. महायुती म्हणूनच ही निवडणूक लढली गेली होती. मात्र मुख्यमंत्री हे पदही अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचं असं ठरलं होतं याचा आग्रह शिवसेनेकडून सुरु झाला, तसंच आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. ज्यामुळे ही युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र जून २०२२ मध्ये शिवसेना फुटली आणि त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचं सरकार आलं. यानंतर आणखी वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. आता महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.

Story img Loader