मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर विरोधक आरोप करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच मला खोट्या केसमध्ये अडकवलं त्यासाठी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनाही मदतीला घेतलं. तसंच उद्धव ठाकरेंनीही त्यांच्यावर टीका केली. या सगळ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. अभिमन्यू चक्रव्युहात अडकला होता त्याला बाहेर येता नव्हतं मी तसा नाही असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. कार्यकर्त्यांनी आता येणाऱ्या निवडणुकीला उत्साहाने सामोरं जायचं आहे. विरोधक छोटं काम केलं तरी त्याचा गवगवा असा करतात जसं काही त्यांनीच सगळं केलं. तर आपण सत्तेत असतानाही जेव्हा काम करतो तेव्हा ते लोकांपर्यंत नीट पोहचवत नाही. पण तुम्ही ते पोहचवा असंही आवाहन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कार्यकर्त्यांना केलं. सावनेर या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आपल्याला लढावीच लागेल

“भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आपल्याला लढावीच लागेल. आज कशाप्रकारचा नरेटिव्ह तयार केला जातो आहे, आता अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पोलीस आयुक्तांनी म्हणजेच परमबीर सिंगने त्यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला. त्यानंतर कुणीतरी कोर्टात जातं. सरन्यायाधीशांचं पीठ सांगतं की आरोपांत तथ्य आहे अनिल देशमुखांवर FIR दाखल करा. महाराष्ट्राचे ते गृहमंत्री आहेत, सीबीआयने चौकशी करावी. कोर्टाने दिलेला एक एक निर्णय तुम्ही बघा. त्या निर्णयांमध्ये जे बाहेर आलं आहे ते भयंकर आहे. आज अनिल देशमुख सांगत आहेत परमबीर सिंग यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं माझ्यावर आरोप करायला.”

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “चांदीवाल आयोगाचा अहवाल मविआच्या काळातच आला”, देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज अशाप्रकारे…”

अलिकडच्या काळात मी अनेकांचा लाडका झालो आहे

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अलिकडच्या काळात मी सगळ्यांचा लाडका झालो आहे. एक पोलीस आयुक्त ज्यांचं राज्य आहे त्या गृहमंत्र्याच्या विरोधात विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन आरोप करुन नोकरी घालवण्यासाठी पुढे येईल का? अनिल देशमुख लपवाछपवी करतात. त्यांच्यावर असलेली केस भाजपाने टाकली नाही, केंद्र सरकारने टाकली नाही. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने हायकोर्टाने केस टाकली आणि त्यामुळे ते तुरुंगात गेले.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

 Devendra Fadnavis News
देवेंद्र फडणवीस यांनी सावनेरमध्ये केलेल्या भाषणात अनिल देशमुख यांच्या आरोपांना उत्तर दिलं. तसंच मी अभिमन्यू नाही, किती चक्रव्यूह रचले तरीही ते भेदू शकतो असंही फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुखांच्या आरोपांवर मी उत्तर देणंही माझ्यासाठी कमीपणा आहे पण..

अनिल देशमुख आता भाजपावर आणि माझ्यावर आरोप करत आहेत कारण त्यांना लोकांकडून सिंपथी मिळवायची आहे. बघा माझ्यावर कसा अन्याय झाला हे लोकांना दाखवून द्यायचं आहे पण यांना जशास तसं उत्तर आपण दिलं पाहिजे. यांच्या आरोपांवर बोलणं मी माझ्यासाठी कमीपणा समजतो. साळसूद आणि साव बनून जे फिरत आहेत. अलिकडच्या काळात माझ्यावर अनेकांचं प्रेम वाढलं आहे. त्या महाविकास आघाडीच्या लोकांना हे समजलं आहे की महायुतीला खिळखिळं करायचं असेल तर एकाच व्यक्तीवर हल्ला केल्याने आपण महायुतीला खिळखिळं करु शकतो. त्यामुळे सकाळचा भोंगा माझ्याविरोधात, त्यांच्या पक्षातले तीन लोक मग तेच बोलतात, मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकही तसंच बोलतात. सगळे मिळून बोलतात मला खूप आनंद आहे. मात्र त्यांना हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीसची ( Devendra Fadnavis ) ताकद भाजपाचे हजारो कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीसची कवचकुंडलं भाजपाचे कार्यकर्ते आहेत. अभिमन्यूला चक्रव्युहात फसवण्यात आलं. त्याला चक्रव्युहातून बाहेर येणं माहीत नव्हतं. पण तुमच्या आशीर्वादाने कितीही चक्रव्यूह मांडले तरीही ते कसे भेदायचे हे मला माहीत आहे, ते आपण भेदून दाखवणार आहोत. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.