scorecardresearch

Premium

“आम्हाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे परिवार बचाव बैठकीत…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

पाटणा येथे सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल.

Devendra Fadnavis (5)
देवेंद्र फडणवीस (PC : Devendra fadnavis Twitter)

बिहारच्या पाटणा शहरात भारतीय जनता पार्टीविरोधात सर्व विरोधक एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधत आहेत. देशभरातील १५ हून अधिक पक्षांचे नेते या बैठकीला गेले आहेत. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीवर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार टीका सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही परिवार बचाव बैठक आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाटण्यात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला त्यांनी ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं असलं तरी ती ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे. देशातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्र आल्या आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत, म्हणूनच ते लोक एकत्र आले आहेत. यांच्यासाठी राज्य चालवणं हा एक धंदा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीसाठी, नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे.

jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
uddhav thackeay sharad pawar devendra fadnavis
“फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार अन् उद्धव ठाकरे…”, भाजपाचा हल्लाबोल
Aditya Thackeray Uday Samnat
“दाव्होसला ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार का?” आदित्य ठाकरेंची उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यावरून टीका; म्हणाले, “तिथे जानेवारीपर्यंत…”
devendra-fadnavis
“सर्वप्रथम तुम्ही रुग्णालयात जा,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा रवींद्र टोंगे यांना प्रेमाचा सल्ला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ ला या सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन पाहिलं. परंतु जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त ताकदीने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहील. विरोधकांनी असे कितीही मेळावे घेतले तरीदेखील त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही.

हे ही वाचा >> “मराठा समाजाला पद दिलं, आता…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, शरद पवारांसमोरचा गुंता वाढला?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सातत्याने महबुबा मुफ्तीच्या नावाने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे स्वतः महबुबा मुफ्तींसोबत चाललेच होते आता ते त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी आपली परिवारवादी पार्टी वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करण्यासठी ते तयार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis slams uddhav thackeray over presence in patna opposition meeting asc

First published on: 23-06-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×