महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झालं आहे. मात्र, सत्तांतरानंतर महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आली आहे, मात्र बिहारमध्ये भाजपाला सत्तेबाहेर जावं लागलं. त्यामुळे बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याबरोबरच शिवसेनेचा संदर्भ देत विरोधी पक्षांना टोला लगावला. बिहारमधील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख करत एक महत्वाचं विधान केलं आहे. ठाण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे विधान केलं.

नक्की पाहा >> Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमधील सत्ताबदलावरुन नितीशकुमार यांच्यावर टीका करताना सुशीलकुमार मोदींनी महाराष्ट्रातील संदर्भही दिला.“महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला. राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षाही अनेकपट जास्त आहे,” असं सुशीलकुमार मोदी म्हणाले.

नक्की वाचा >> ‘भाजपा मित्रपक्ष संपवायचं काम करते’ या टीकेवरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “पवार साहेबांचं दु:ख…”

बिहारमधील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्राचा संदर्भ दिल्यावरुनच पत्रकारांनी फडणवीस यांना, “सुशीलकुमार मोदी यांनी वक्तव्य केलं आहे की, भाजपा मित्रपक्षांना धोका देत नाही. मात्र जे लोक भाजपाला धोका देतात त्यांचं काय होतं हे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल. शिवसेनेला उद्देशून त्यांनी असं म्हटलेलं का?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, “खरंच आहे. बिहारमध्ये आमचे ७५ लोक निवडून आले. जेडीयूचे ४२ लोक निवडून आले तरी आम्ही नितिशजींना मुख्यमंत्री केलं. भाजपा हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी, “महाराष्ट्रात त्यावेळी शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आता ‘खरी शिवसेना’ आमच्यासोबत आली,” असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis talks about why eknath shinde group came with bjp to form government scsg
First published on: 11-08-2022 at 08:48 IST