GST : शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…!”

जीएसटीच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये बोलताना थेट निशाणा साधला आहे.

Sharad Pawar great leader adults dont want to give too many answers Mischievous remarks of Devendra Fadnavis

गेल्या महिन्याभरापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असताना दिवाळीच्या आदल्या दिवशी केंद्रानं हे दर कमी केले. केंद्राकडून करकपात करण्यात आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ४ रुपये आणि ७ रुपयांनी कमी झाले. त्यानंतर काही राज्य सरकारांनी देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात महाराष्ट्रात असा निर्णय कधी होणार? या प्रश्नावर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांनी थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेल दरकपात आणि जीएसटीचा परतावा या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये ऐन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटताना दिसत आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी त्यावर भाष्य केले आहे. “राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल,” असे शरद पवार म्हणाले.

“केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं लवकर द्यावे”; इंधनदर कपातीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया, राज्य सरकारची पाठराखण

फडणवीसांनी साधला थेट निशाणा!

दरम्यान, याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांच्या विधानावर उलट निशाणा साधला. “मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे. गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही. पण केंद्रानं ५ रुपये कर कमी केला की आपोआप ७ रुपये टॅक्स कमी होतो. आमचं म्हणणंय तो १०-१२ रुपये करा ना”, असं फडणवीस म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis targets sharad pawar statement on gst petrol diesel price pmw

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या