scorecardresearch

“लवकरच इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करू”, देवेंद्र फडणवीसांचे चैत्यभूमीवरून आश्वासन

महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून अभिवादन केले जात आहे.

“लवकरच इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करू”, देवेंद्र फडणवीसांचे चैत्यभूमीवरून आश्वासन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देवेंद्र फडणवीस (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स)

महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून अभिवादन केले जात आहे. आंबेडकरी अनुयायी आज सकाळपासूनच चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जमा होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच एक सामान्य व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा >>> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो- एकनाथ शिंदे

“आजचा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यांनी आपल्याला संविधान दिले. या संविधानाच्या मार्फत त्यांनी खऱ्या अर्थाने देशात समतेचं, लोकशाहीचं राज्य आणले. व्यक्तीला जन्माने, जातीने, धर्माने, भाषेने समान अधिकार असेल. कोणामध्येही भेद करता येणार नाही असे बीजमंत्र देणारे हे संविधान आहे,” अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, म्हणाले “डॉ. आंबेडकर सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग…”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या पाठीवरचे सर्वोत्तम संविधान आपल्याला दिले. आज आपला देश प्रगती करत आहे. संविधानाने आपली लोकशाही जिवंत ठेवली. सामान्यातील सामान्य माणसाला सर्वोच्च स्थानी जाण्याचा मार्ग आणि संधी संविधानाने उपलब्ध करून दिली. आज खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानण्याकरिता तसेच त्यांचे शतश: नमन करण्यासाठी आपण त्यांना मानवंदना देत आहोत,” अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> कुराण, इस्लामचा संदर्भ देत सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल, म्हणाल्या “जर हिंदू असतील तर…”

“त्यांनी आपल्याला समतेचा, बंधुतेचा, मानवतेचा संदेश दिला. हा संदेश जगाचे कल्याण करणारा आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार संविधानाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्य म्हणून देशातील प्रत्येकात रुजवण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. हे काम अत्यंत मौल्यवान आहे. चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, याचं एकमेव कारण आहे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान आहे. माझ्यासाठी एकच धर्मग्रंथ आहे. तो म्हणजे भारतीय संविधान होय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> “दादा तुम्हाला कुठून माईक खेचायला…”, पत्रकार परिषदेला पोहोचताच उद्धव ठाकरेंची अजित पवारांना विचारणा, जयंत पाटीलही लागले हसू

“आपण इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिभव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच आपण या स्मारकाचे काम पूर्ण करू,” असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:49 IST

संबंधित बातम्या