Devendra Fadnavis : “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं नाही, काँग्रेसने…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन ट्रोलिंग, कोण काय म्हणालं?

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना एक वाक्य उच्चारलं आणि त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

Devendra Fadnavis Trolled For His Statement
देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वक्तव्यावरुन ट्रोल केलं जातं आहे. (फोटो-देवेंद्र फडणवीस, एक्स् पेज)

Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटमधला पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच पेटलं आहे. या घटनेवरुन सरकावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीने मोर्चा काढला आणि जोडे मारो आंदोलन केलं. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एक वाक्य उच्चारलं आणि विरोधकांना आयतं कोलीत हाती मिळालं. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जे वाक्य उच्चारलं त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं आहे.

आंदोलनाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
sanjay raut nana patole
Nana Patole : महाविकास आघाडीत जुंपली? हरियाणातील पराभवानंतर…
pratapgad mashal Mahotsav
किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव; राज्यभरातील शिवभक्तांची उपस्थिती
Islampur Assembly Constituency
Islampur Assembly Constituency: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व; महायुतीत इस्लामपूरची जागा कोणाला मिळणार?
palus kadegaon assembly constituency
Palus Kadegaon Assembly Constituency : काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना महायुतीकडून कोण आव्हान देणार?
rajapur assembly constituency
Rajapur Assembly Constituency: राजापूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी? अविनाश लाड यांचा मतदारसंघावर दावा
former bjp mla bal mane gave hints to contest assembly election
रत्नागिरीत भाजपा बंडाच्या तयारीत; माजी आमदार बाळ माने यांनी दिले निवडणूक लढविण्याचे संकेत
What CM Eknath Shinde Said?
Eknath Shinde : “लाडकी बहीण योजनेवरुन आशा भोसलेंनी सावत्र भावांना चपराक…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
Mangaon Bus Accident
Mangaon Bus Accident : रायगडमध्ये भीषण अपघात, एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली, आठ महिला जखमी

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “…उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?” फडणवीसांनी सांगितल्या ७० वर्षांतील तीन घटना

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?” ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जातं आहे. कोण काय म्हणालं आपण जाणून घेऊ.

खासदार अमोल कोल्हेंनी काय म्हटलंय?

वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी… पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार..“ मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर” या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांनासुद्धा लागू होतील अस वाटलं नव्हतं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

महाराजांनी सूरत लुटले नाही, चुकीचा इतिहास आहे, महाराजांच्या शौर्या वर आक्षेप. हा अक्षम्य गुन्हा आहे..एकदा नाही दोनदा लुटली ..फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात.

प्रतीक पाटील काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणत आहेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, ही इतिहासाशी लबाडी आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही गोर गरिबांना हात न लावता सुरत एकदा नव्हे दोनदा लुटली आहे फडणवीसांनी असेच बोलत राहावे. विधानसभा निवडणुकीत भाजपला दणका अजून जोरात जनता देईल.

अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होते आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं गुजरात प्रेम उफाळून आलं आहे अशी टीका महाविकास आघाडीकडून केली जाते आहे. आता याबाबत देवेंद्र फडणवीस काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis trolled by mva leaders for his statement about chhatrpati shivaji maharaj scj

First published on: 01-09-2024 at 17:25 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या