विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने अनेक योजना मांडल्या. यापैकी काही योजनांसाठी ‘पुरेशी तरतूद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ‘पुरेशी तरतूद’ म्हणजे काय ते स्पष्ट करावं. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

फडणवीस म्हणाले की, “दादा तुम्ही म्हणालात पुरेशी तरतूद काय म्हणजे काय ते समजलं नाही. पण दादा हा केवळ तुमच्या आणि माझ्या भाषेतला फरक आहे. तुम्ही जरा कडक आहात त्यामुळे तुम्ही आवश्यक तरतूद असा शब्द वापरता. तुमचे याआधीचे अर्थसंकल्प पाहा.” त्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांनी २०२१-२२ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी वाचून दाखवल्या. त्यात आवश्यक तरदूद असा शब्द सातत्याने आला असल्याचं निदर्शनास आणून दिलं.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

हे ही वाचा >> “आजूबाजूच्या चमच्यांमुळे मुख्यमंत्री शिंदे त्रस्त”; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, “मी त्यांना जवळून…”

“तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक…”

त्यानंतर फडणवीस म्हणाले की, दादा तुम्ही कडक स्वभावाचे असल्यामुळे तुम्ही ‘आवश्यक’ असा शब्द लिहिलात आणि मी स्वभावाने थोडा मृदू असल्याने मी ‘पुरेशी तरतूद’ असा शब्द लिहिला. एवढाच फरक आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये फार काही फरक नाही. तसेच दोघांच्या अर्थसंकल्पातील ‘चिन्हांकित’ आणि ‘प्रश्नांकित’ हे दोन वेगवेगळे शब्ददेखील फडणवीस यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.