भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाच्या अलीकडील काही निर्णयांमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी आणि असुरक्षित स्थितीत आहेत. महाराष्ट्राचा नवा चेहरा, जाणकार, पुढील हिंदुत्ववादी नेता म्हणून पक्षाने त्यांना सतत राष्ट्रीय मंचावर पुढे आणले होते. मात्र आता गेल्या तीन दिवसांत विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस ते भाजप सरचिटणीस या पदावर झालेली बढती आणि महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी हे त्याचेच संकेत आहेत. दोघेही फडणवीसांचे कट्टर विरोधक आहेत. या निर्णयांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की केंद्रीय नेतृत्वाने आपल्या पक्षाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या नेत्याचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंना तिकीट नाकारले

kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री तावडे यांना बाजूला सारले होते. मंत्रिमंडळात विभाग बदलण्यापासून अखेर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठा नेते असणाऱ्या विनोद तावडेंना तिकीट नाकारण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चांगले संबंध असणाऱ्या नागपुरातील माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते चंद्रकांत बावनकुळे यांनाही तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भातील किमान सहा जागांवर भाजपाचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

तावडे आणि बावनकुळे यांना तिकीट नाकारण्याच्या निर्णय म्हणजे घोडचूक

“तावडे आणि बावनकुळे यांचे पुनर्वसन हे फडणवीस यांचे पक्षातील वजन कमी झाल्याचे लक्षण आहे. आम्ही त्यांच्या क्षमतेवर किंवा सचोटीवर शंका घेत नसलो तरी पक्ष व्यावहारिक राजकारणात परत येईल. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राजकारण चालेल, पण २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात ते चालणार नाही. पक्ष ओबीसी आणि मराठा समाजाला विरोध करू शकत नाही,” असे भाजपा उपाध्यक्षांनी म्हटले आहे. तावडे आणि बावनकुळे यांना तिकीट नाकारण्याच्या निर्णयाला घोडचूक असल्याचे भाजपच्या उपाध्यक्षांनी म्हटले. त्या वेळी, अनेकांनी याचे वर्णन धाडसी निर्णय म्हणून केले होते, पण यामुळे त्यांच्या मतदारसंघात गोंधळ निर्माण झाला.

बावनकुळेंना उमेदवारी देऊन गडकरींचे हात बळकट करण्याचा प्रयत्न

विधानपरिषद निवडणुकीसाठी बावनकुळे यांच्या उमेदवारीवरून भाजपा विदर्भातील तेली समाजापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. त्याचवेळी या निर्णयाने गडकरींचे हात बळकट केले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाने माझी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. आता त्यांनी मला परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भूतकाळात जे घडले त्याबद्दल मी दुःखी का व्हावे?, असे बावनकुळे यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले. तर राजकारणात संयमाची किंमत असते. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा एक मोठा संदेश आहे, असे विनोद तावडे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना म्हटले आहे.

फडणवीसांनी घाणेरडे राजकारण केले – एकनाख खडसे

पण फडणवीसांनी बाजूला सारल्यानंतर भाजपा सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी हा संयम बाळगला नाही. “भिंतीवरील लिखाण सर्वांसाठी स्पष्ट होते. फडणवीस यांनी घाणेरडे राजकारण केले. त्यांनी आपले सर्व राजकीय प्रतिस्पर्धी संपवले. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास त्यांना लाभल्यामुळे हे घडले. पण लवकरच परिस्थिती बदलू लागली. छळाला कंटाळून मी भाजपा सोडला. मी फक्त आणि फक्त फडणवीसांमुळे भाजपा सोडला,” असे एकनाथ खडसे म्हणाले.

तिकीट वाटपावरुन फडणवीसांना लक्ष्य करणे अयोग्य

 “विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्याचा मला आनंद आहे. ही एक महत्त्वाची भूमिका आहे जी पूर्वी दिवंगत (गोपीनाथ) मुंडे आणि (प्रमोद) महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी बजावली होती,” असे फडणवीस म्हणाले होते. पण त्यांच्या जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, तिकीट वाटप किंवा कॅबिनेट बर्थच्या बाबतीत फडणवीस यांना लक्ष्य करणे अयोग्य आहे कारण हे कोअर कमिटी स्तरावर ठरवले जाते आणि केंद्रीय नेतृत्वाने त्याला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे चांगली गेली, पण एक संघटनात्मक माणूस आणि टीम लीडर म्हणून फडणवीस अपयशी ठरले, अशी भाजपामध्ये चर्चा आहे. एप्रिल २०१३ मध्ये जेव्हा त्यांना महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष म्हणून आणण्यात आले तेव्हा ते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पारंपारिक प्रतिस्पर्धी गटांना एकत्र आणताना दिसले. आठ वर्षांनंतर, शिवसेनेसोबतची २५ वर्षे जुनी युती तुटल्याबद्दल पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी त्यांना दोषी ठरवले.

पंकजा मुंडेशी लढत पक्षातील अनेकांची नाराजी ओढावून घेतली

लोकांबद्दलच्या फडणवीसांच्या वैरामुळे पक्षात आणखी दुफळी माजली, ज्याकडे ते अंतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून पाहत होते, असे म्हटले जाते. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांच्याशी त्यांची उघड लढत पक्षातील अनेकांची नाराजी ओढवून घेतली. ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाच्या प्रकाशनाच्या वेळी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करणारे भावनिक भाषण केले, हे कदाचित फडणवीस यांच्यावर पक्षाच्या नाराजीचे पहिले लक्षण आहे.

“फडणवीस यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहण्याची चूक केली. शिवसेना-भाजपा युती सुरळीत करण्यासाठी त्यांनी मध्यस्थ म्हणून नीरज गुंडे यांच्यावर विसंबून राहिले. त्यांनी पक्षातील सर्व अनुभवी नेत्यांना दूर ठेवले,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर पक्षाच्या कार्यकर्त्याने सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण दरेकर यांची भाजपातर्फे राज्य परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले प्रसाद लाड फडणवीस यांचे विश्वासू आणि सर्वशक्तिमान सल्लागार बनले. गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “मला भाष्य करायचे नाही, मी कोणाचा विश्वास का तोडू?”.

फडणवीसांची दिशाभूल केले असे म्हणणे हास्यास्पद- प्रसाद लाड

फडणवीस यांची काही निवडक लोकांकडून दिशाभूल झाली आहेत, असे मानणे हास्यास्पद असल्याचे लाड म्हणाले. मग ते दरेकर असो किंवा मी, आम्ही फक्त एक कार्यकर्ता आहोत, असेही लाड म्हणाले.

२०१९ च्या निवडणुकीनंतर फडणवीसांची दिशाभूल केल्याबद्दल भाजपमधील एक गट दरेकर आणि लाड या बाहेरील लोकांना दोषी ठरवतो. ज्यामुळे निकाल जाहीर झाल्यावर शिवसेनेसोबतची निवडणूकपूर्व युती तुटली आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली.

एप्रिलमध्ये, कोविड दुसर्‍या लाटेदरम्यान, फडणवीसांनी लाड आणि दरेकर यांनी भाजपाच्या वतीने दमणस्थित फार्मा कंपनीकडून रेमडेसिव्हिर तयार करण्याच्या वादग्रस्त कृतीबद्दल बचाव केला होता. फडणवीस यांच्या राज्याच्या व्यवस्थापनाबद्दल विचारले असता, दिल्लीतील पक्षाच्या एका नेत्याने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाक्याचा उल्लेख करत “छोटे दिल से कोई बडा नहीं होता, टूटे दिल से कोई खडा नहीं होता,” असे म्हटले.