भाजपाने आपल्या धक्कातंत्र कायम ठेवत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असून फडणवीस स्वत: कोणतेही पद घेणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय. राजभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल,” असं सांगितलं.

तसेच स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी, “मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. “या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करु. पंतप्रधान मोदींनी जे विकासपर्व सुरु केलं आहे ते आम्ही राबवू. मागील अडीच वर्षांपासून जो महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्सप्रेस धावू लागेल,” असं फडणवीस म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

“काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहायला आम्ही तयार नाही. उद्धवजींनी आमदारांऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राधान्य दिलं त्यांची कास धरुन ठेवली. आज हे सरकार गेलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राला पर्यायी सरकार देणार आहोत. आधी विचारलं जायचं तेव्हा सांगितलेलं की पर्यायी सरकार देऊ निवडणुका लागणार नाही.” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

“भाजपा आणि शिवसेनेचा विधीमंडळ गट आणि १६ अपक्ष आणि इतर आमदार सोबत आलेले आहेत. या सगळ्यांचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलंय. भाजपाने हा निर्णय केला आम्ही सत्तेच्या मागे नाही. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी काम करत नाही ही तत्वांची, हिंदुत्वाची लढाई आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis will not be a part of cabinet scsg
First published on: 30-06-2022 at 16:54 IST