शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या कथित बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटींग झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पक्षाच्या संपर्कात नसून काल म्हणजेच २० जून रोजी रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीपासूनच शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय. असं असतानाच शिंदे हे गुजरातमधील सुरत येथे काही शिवसेना आमदारांसोबत असल्याची माहिती समोर आली असून त्यांनी काही अटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्या आहेत.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

मागील २४ तासांपासून राज्यात सुरु असणाऱ्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशापद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी भाजपाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच आता भाजपाच्या एका नेत्याने आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची शासकीय पूजा ही सध्याचे विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या नात्याने करतील असं भाकित व्यक्त केलंय.

congress and bjp campaign in solapur lok sabha constituency
सोलापुरात काँग्रेस व भाजपचा प्रचार शिगेला 
ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल; म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त…”
alibag rape marathi news
रायगड: पत्नीनेच पतीविरोधात दिली बलात्काराची तक्रार, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साताऱ्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलंय. “सरकार अस्थिर झालंय की झालं नाही यावर माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,” असं जयकुमार गोरे म्हणाले. यावर पत्रकारांनी कधी असा प्रश्न विचारला असता जयकुमार गोरे यांनी, “खूप वेळ नाही. लवकरच आपल्याला बातमी येईल आणि यंदाची आषाढीची पूजा फडणवीस करतील,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

म्हणजेच जयकुमार गोरे यांनी १० जुलैआधी राज्यामध्ये सत्तांपालट होईल असा सूचक इशारा दिला आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्यावतीने पांडुरंगाची पूजा करतात. यंदा ही पुजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार नसून ती देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल असं जयकुमार गोरे यांना आपल्या विधानामधून सूचित करायचं होतं.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असल्यासंदर्भात विचारलं असता नारायण राणे हसून म्हणाले, “ते कुठं आहेत असं…”

सध्या शिवसेनेचे नेते रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी सुरतमधील ले मॅरिडियम हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. या चर्चेमधून काय समोर येते यावरच पुढील राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. शिंदे यांना शिवसेनेच्या २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहे याची आकडेवारी स्पष्ट होऊ शकलेली नाही.