हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत आणि आम्हाला सांगून राहीले….फडणवीस यांची धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका

भाजपाला जनता मातीत गाडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी टीका मुंडे यांनी केली होती. अकक्लकोट इथल्या कार्यक्रमात फडणवीस यांनी पलटवार केला.

भाजप आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दररोज सुरु आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडत नाहीत. धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपावर टीका केली होती. आमचे जे शक्तीपीठ आहे त्यावर टीका केली की यश मिळते असं भाजपाला वाटत असेल. पण असे प्रयत्न केले तरी भाजपाला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका मुंडे यांनी केली होती.

दरम्यान दिवाळीत धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा राज्यात विविध समस्या असतांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक भान विसरल्याची टीका करण्यात आली होती.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा”, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या हस्ते अकक्लकोट इथे विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन झाले. त्यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra phadnvis criticized minister dhanajay munde asj

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या