scorecardresearch

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे म्हटले असते- धनंजय मुंडे

‘अरे किती महापुरुषांचा अपमान कराल’

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे म्हटले असते- धनंजय मुंडे
Dhananjay Munde: शिवसेना आता शिवसेना राहिली नसून ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रिपदासाठी भाजपासमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे, अशी टीका करत वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते.

नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लगावला आहे. कोल्हापुरातील नेसरीच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा हे भाजपवाले करु लागले आहेत. स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता, परंतु ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपावाले करत आहेत. नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते’.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन पुकारलं असून नेसरी येथील जाहीर सभेने दुस-या दिवसाची सुरुवात केली. ‘अरे किती महापुरुषांचा अपमान कराल. किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान…त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

सत्तेत असलेल्या भाजपावाले ट्रिपल तलाक, सबसिडी यावर चर्चा करतात. परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी विचारला.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-04-2018 at 19:09 IST

संबंधित बातम्या