संवेदनशीलता : फ्लाईट चुकलेल्या बीएसएफ जवानाला धनंजय मुंडेंनी काढून दिले तिकीट

जवानाने मानले आभार

अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांना तोंड देत भारतीय जवान देशाच संरक्षण करतात. पण, काहीवेळा असं प्रसंग घडतात की, जवान एखाद्या अडचणीत सापडतात. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील जवानासोबत घडली. अडचणीत सापडलेल्या जवानाच्या मदतीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे धावून गेले. त्यामुळे या जवानाला वेळीत ड्यूटीवर हजर होता आले. वैभव मुंडे असं या जवानाचं नाव असून, तो बीएसएफमध्ये काश्मीरमध्ये कार्यरत आहे.

सुटी संपल्यानंतर परत देशसेवेसाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील बीएसएफ जवान वैभव मुंडे याच्यासमोर एक अडचण निर्माण झाली. श्रीनगरला रुजू व्हायला निघालेल्या वैभवचे औरंगाबाद येथून दिल्ली मार्गे श्रीनगरसाठी सकाळी ८.००वा. विमान होते. परंतु औरंगाबादला येणारी रेल्वेला विलंब झाल्यामुळे विमानतळावर पोहचण्यास वैभवला उशीर झाला. अगदी थोडक्यात श्रीनगरला जाणारे विमान चुकले. त्यामुळे वेळेवर बीएसएफ मुख्यालयात पोहचणार की उशिरा पोहचल्यामुळे कारवाईचा सामना करावा लागणार? या चिंतेत वैभव विमानतळावर बसला होता. याचवेळी धनंजय मुंडे हे त्याच्या मदतीला धावून आले.

बीड जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा आटोपून औरंगाबाद येथून मुंबईकडे निघालेल्या धनंजय मुंडे यांनी विमानतळावर अचानक भेटलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील या जवानाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. घडलेला प्रकार कळताच मुंडे यांनी आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ जवान वैभवसाठी एअर इंडियाच्या AI 442 या विमानाचे औरंगाबाद-दिल्ली-श्रीनगर असे तिकीट काढून दिले. मुंडे यांच्यामुळे संकट टळल्यानं वैभवनं सुटकेचा निःश्वास सोडला. मुंडे यांनी ऐनवेळी केलेल्या मदतीबद्दल बीएसएफ जवान वैभव यानेही त्यांच्यातील संवेदनशील ‘माणुसकीचे’ आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhananjay munde help army man gave airplane ticket bmh

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या