मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले असून संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान आता आणखी एका दसरा मेळाव्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

करुणा मुंडेंनी काय म्हटलं आहे?

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीदेखील स्पर्धेत आहे. मी भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ इच्छित आहे. मी गेल्या २६ वर्षांपासून वंजारी समाजाची, मुंडे घराण्याची सून आहे. मीदेखील या स्पर्धेत असून, दसरा मेळाव्याला भगवान गडावर माझं स्वागत करावं अशी महाराष्ट्राला विनंती आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडेचा त्या दिवशी वाढदिवस आहे. त्यामुळे तिथे दसरा मेळावा घेणारच,” असा निर्धार करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या; करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप

भगवान गडावरील मेळाव्याला ५० वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे येथे ३५ वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.

२०१६ मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी मेळावा घेण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. २०१७ मध्ये त्यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली.