"शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे..." पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातील आव्हानावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया | Dhananjay munde on pankaja munde statement at dasara melava savargaon beed rmm 97 | Loksatta

“शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे…” पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातील आव्हानावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

दसरा मेळाव्याच्या भाषणातून पंकजा मुंडेंनी दिलेल्या आव्हानाबाबत धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे…” पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातील आव्हानावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
संग्रहित फोटो

बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी केलेल्या भाषणातू पंकजा मुंडे यांनी विविध राजकीय चर्चांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, आपण पक्षात नाराज नाही. पक्षानं तिकीट दिलं तर २०२४ सालच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेच्या विधानानंतर परळी मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंच्या आव्हानावर भाष्य करताना धनंजय मुंडे म्हणाले “प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी पक्ष निवडणूक लढवण्याची संधी देतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला त्या-त्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते.”

हेही वाचा- “….तर मी दुर्गेचं रुप धारण करेन”, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

“निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे कुणी कुठून निवडणूक लढवावी आणि कुठून निवडणूक लढवू नये, हा निर्णय ज्याचा त्याचा पक्ष ठरवेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढवावीच लागेल. शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे मायबाप जनता ठरवेल” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा- Dasara Melava 2022: “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, निष्ठा आहे, माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मला शोभेल असं वागा. पक्षाने तिकीट दिलं तर मी २०२४ च्या तयारीला लागणार आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“बीकेसीत गद्दारांची सर्दी, शिवाजी पार्कवर निष्ठेची वर्दी”; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

संबंधित बातम्या

सीमावाद: “मोदींच्या मध्यस्थीने युक्रेन-रशिया युद्ध थंडावले, मग…”; ‘बोम्मई पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकतात’ असं म्हणत सेनेचा टोला
“मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?
“तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”
VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अक्षय कुमार नाही तर ‘हे’ अभिनेते आहेत सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय कलाकार
मुंबईः विलेपार्ले येथे ७४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची मुलाकडून हत्या; मृतदेह माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
विश्लेषण: उपांत्यपूर्व फेरीतून कोणते संघ करणार आगेकूच? फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील…?
‘केजीएफ’ फेम अभिनेत्याचे निधन, ‘रॉकी’बरोबर साकारलेली महत्त्वाची भूमिका
सीमावाद: “मोदींच्या मध्यस्थीने युक्रेन-रशिया युद्ध थंडावले, मग…”; ‘बोम्मई पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकतात’ असं म्हणत सेनेचा टोला