“होम क्वारंटाईन असलो, तरी काम थांबवून कसं चालेल”; धनंजय मुंडे झाले मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी

धनंजय मुंडेना काही दिवसांपूर्वीच मिळाला डिस्चार्ज

संग्रहित

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. उपचारांच्या साहाय्यानं धनंजय मुंडे यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून, सध्या घरातच क्वारंटाइन आहेत. घरातूनही त्यांचं काम सुरूच असून, राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही धनंजय मुंडे व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभागी झाले.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सहभागी झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. “करोना आजारावर मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज तर मिळाला. मात्र, पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. असे असले तरी कामं थांबवून कसं चालेल. म्हणून आज परळी वैजनाथ येथील घरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झालो”, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे त्यांच्या रिपोर्टमधून निष्पन्न झालं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २२ जून रोजी धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचे सांगितले होते. सध्या ते परळी वैजनाथ येथील घरी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhananjay munde participants in maharashtra state ministry meeting bmh

ताज्या बातम्या