“पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही, भाजपाने डोनाल्ड ट्रम्प यांना आणले तरी विजय माझाच”

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे राष्ट्रवादीत

 पंतप्रधान नरेंद्र मोदी संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाची असलेल्या परळी मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत प्रचार सभा होणार आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. परळी मतदार संघातील घाटनांदूर येथील प्रचार सभेत मुंडे बोलत होते.

नेहमीप्रमाणे परळी मतदारसंघात ‘काटे की टक्कर’ बघायला मिळत आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दोन्ही नेते एकही संधी सोडत नाहीत. महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी १७ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा होणार होत. यावरून धनंजय मुंडे यांनी काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले, “भाजपा पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे. पण भारतातील नेत्यांबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी परळीत सभेला आले तरी माझा विजय निश्चित आहे,” असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच परळी मतदारसंघात भाजपाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जी रॅली पहिली त्याचा धसका घेतला म्हणून बड्या नेत्यांना येऊन प्रचारासाठी येत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माळी-धनगर-वंजारी या समीकरणातील सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे पंकजा मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपासोबत असलेले कल्याणराव आखाडे लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. भाजपसोबत एकनिष्ठ काम करून सत्तेत वाटा दिला नाही, वारंवार डावलले गेले. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ओबीसी मतांचा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhananjay munde reply on prime narendra modi address rally in parali bmh

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या