Dharashiv ZP Election 2017 Winner List: धाराशिवमध्ये २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा पाहायला मिळाला होता. ५५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल २६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती. शिवाय देशात आणि केंद्रात पाहायला मिळालेल्या मोदी लाटेचा जिल्ह्यात फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. शरद पवार आणि अजित पवार यांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे २०१७ साली पाहायला मिळाले होते.

भाजपाला केवळ चार जागा

भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्याच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र असताना धाराशिवच्या जनतेने मात्र, राष्ट्रवादीच्या पारड्यात सर्वाधित मतं टाकली होती. भाजपाला २०१७ साली जिल्ह्यात केवळ चार जागा जिंकत्या आल्या होत्या. तर, मित्र पक्ष शिवसेनेला (त्यावेळी एकत्र असताना) ११ जागांवर विजय मिळवता आला होता.

पक्षीय बलाबल

पक्षाचे नावजिंकलेल्या जागा
राष्ट्रवादी काँग्रेस२६
काँग्रेस१३
शिवसेना११
भाजप
भारतीय परिवर्तन सेना
एकूण५५

राष्ट्रवादी – काँग्रेस सत्तेत

राष्ट्रवादी काँग्रेस २६ जागा आणि काँग्रेसने १३ जागांसह धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती. भाजपा आणि शिवसेनेला मात्र विरोधात बसावं लागलं होतं. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेवर नेताजी पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होेती. तर, अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती.