Dharashiv ZP Election Winner List 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (७ फेब्रुवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडली. आज (९ फेब्रुवारी) निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. धाराशिवमध्ये भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यात नेमके काय होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून होती. अखेर धाराशिवमधील विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ५५ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांमध्ये एकूण ११० प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १,६५७,५७६ इतकी आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २६ जागांसह आघाडी घेतली होती, तर काँग्रेस पक्षाने १३ जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले होते.
जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी
जवळा जिल्हा परिषद गट – धनंजय सावंत (शिंदे गट)
ढोकी जिल्हा परिषद गट – तीर्थराज घाडगे (ठाकरे गट)
शेळगाव पंरडा गट – अमर मोरे (शिंदे गट)
उरण नवघर गट – प्रेरणा पाटील (ठाकरे गट)
तेर जिल्हा परिषद गट – अर्चना पाटील (भाजपा)
आलूर गट – आप्पासाहेब पाटील (शिंदे गट)
पंचायत समित्यांमधील विजयी उमेदवारांची यादी
ढोकी पंचायत समिती गण – अमर समुद्रे (ठाकरे गट)
अपडेट होत आहे…

