scorecardresearch

Premium

“महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…”, मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण द्या, त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागतेय तर वाढवा.

SHinde Fadnavis Govt
अखिल भारतीय मराठा महासंघाची नुकतीच नागपुरात एक महत्त्वाची बैठक पार पडली.

मराठा आरक्षणाविषयी चर्चेसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने नागपुरात बैठक बोलावली होती. ही बैठक नुकतीच संपली आहे. बैठकीनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी दिलीप जगताप म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण द्या, त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागतेय तर वाढवा. त्याचबरोबर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर हे प्रकरण राज्य सरकारला महागात पडेल.

दिलीप जगताप म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ज्वलंत प्रश्न झाला आहे. तो आता मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. आम्हाला आरक्षण हवं आहे. आम्हाला ५० टक्क्यांमध्ये आरक्षण द्या किंवा ५० टक्क्यांबाहेर द्या, परंतु आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसांपासून संघर्ष करत आहेत. तीन दिवसांपासून ते सलाईनवर आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर या सरकारला ते महागात पडेल.

Supriya Sule Sunetra Pawar
“बारामतीत माझ्याविरोधात…”, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या
Manoj Jarange SIT Inquiry
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश
Jayant Patil on vilasrao deshmukh
“राजकारणासाठी व्यक्तिगत नाते तोडू नये”, काँग्रेसमधील ‘काका-पुतण्या’च्या नात्यावर जयंत पाटलांचं विधान!
chhagan bhujbal
भुजबळांच्या बंडाची घोडदौड भाजपच्या दिशेने, ओबीसी आरक्षण लढाईतील वजिर कोण, प्यादे कोण ?

दिलीप जगताप राज्य सरकारला इशारा देत म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर सरकारला ते महगात पडेल. तुम्हाला या महाराष्ट्राचा मणिपूर करायचा असेल तर करा. नसेल करायचा तर मराठ्यांना आरक्षण द्या. कुठल्याही पद्धतीने आरक्षण द्या, अशी आमची मराठा महासंघाची मागणी आहे.

हे ही वाचा >> “कोण सत्तेसाठी गेला की विकासासाठी, याचे आमच्याकडे पुरावे, पण…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर

मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागत असेल तर ती वाढवा. आम्हालाही माहिती आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विरोधी पक्ष आणि समाजिक संघटनांनी आमच्याबरोबर दिल्लीला यावं. हवं तर मी सगळ्यांचं तिकीट काढतो. तिथे सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, आम्हाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नाही, त्यामुळे ताबडतोब आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या, असं मोदी यांना सांगा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dilip jagtap says if you dont want manipur like crisis in maharashtra then give maratha reservation asc

First published on: 11-09-2023 at 16:53 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×