scorecardresearch

रणजितसिंह डिसले यांची अध्ययन रजा मंजूर

रजेबाबत तसेच यापूर्वीच्या त्यांच्या रजेच्या काळाबद्दल माहिती मागवल्याने या रजेबाबतचा निर्णय प्रलंबित होता.

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी असलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत शैक्षणिक संशोधन करण्यासाठी त्यांची प्रलंबित अध्ययन रजा मंजूर करण्याच्या सूचना अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे डिसले यांचा अमेरिकेत अध्यापनासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिसले यांना ‘पीस इन एज्युकेशन’ या विषयावर पीएच.डी करायची आहे. त्यासाठी सहा महिने अमेरिकेतील विद्यापीठात राहायचे आहे. यासाठी त्यांनी रजेचा अर्ज दाखल केला होता. परंतु या रजेबाबत तसेच यापूर्वीच्या त्यांच्या रजेच्या काळाबद्दल माहिती मागवल्याने या रजेबाबतचा निर्णय प्रलंबित होता. याबाबत शिक्षण आधिकारी आणि डिसले यांचे मतांसह वृत्त प्रसिद्ध होताच आज यात शिक्षणमंत्री गायकवाड यांनी त्यांची अध्ययन रजा मंजूर करण्याच्या सूचना दिल्या  आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disney granted study leave with ranjit singh disley