नियुक्त्यांवरून धुळे जिल्ह्य़ात जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

संतोष मासोळे, लोकसत्ता

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम

धुळे : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्य़ातील शिवसेनेत खांदेपालट करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने संघटनात्मक बदल करताना पक्षाने नव्याने दाखल झालेल्यांना पदे बहाल करीत जुन्यांना डावलल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आता डॉ.तुळशीराम गावित यांच्याकडे सोपविण्यात आली, तर हिलाल माळी आणि महेश मिस्तरी यांची सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी स्थायी सभापती सतीश महाले यांच्यावर पुन्हा महानगर प्रमुख पदाची धुरा सोपविली गेली आहे. या बदलाने जिल्ह्य़ात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास एक गट व्यक्त करीत असला तरी या निमित्ताने अंतर्गत धुसफुस चव्हाटय़ावर आली आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला आहे. नव्या कार्यकारिणीनुसार गावित हे धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदार संघात पक्षाचे नेतृत्व करतील. महेश मिस्तरी यांची धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदार संघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर प्रमुखपदी (धुळे महानगर, पूर्व) मनोज मोरे, तर माजी स्थायी समिती सभापती सतीश महाले यांची महानगर प्रमुखपदी (धुळे महानगर, पश्चिम) नियुक्ती करण्यात आली आहे. सेनेचे अनेक माजी नगरसेवक, महानगरप्रमुख, शहर प्रमुख यांनी पक्षात आजवर एकनिष्ठपणे काम केले. त्यांना कुठलेही पद दिले गेले नाही. यामुळे त्यांच्यासह समर्थकांमध्ये डावलण्यात आल्याची भावना आहे. काहींनी संपूर्ण आयुष्य शिवसैनिक म्हणून घालवले, असेही पदाधिकारी आजही कुठल्याच पदावर नाहीत. यावेळी त्यांचा विचार झाला नाही. नव्याने पक्षात आलेल्यांना पदे वाटण्यात आल्याचा सूर शिवसेनेतून उमटत आहे.

संपर्कप्रमुखांचा वरचष्मा

शिवसेनेने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्य़ात भाकरी फिरवली. त्यात अर्थातच संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचे नियोजन असल्याचे दिसते. थोरात हे विधानसभा निवडणुकीपूर्वी धुळे जिल्हा संपर्कप्रमुख होते, त्याआधी ते नांदेडचे संपर्कप्रमुख होते. नांदेडचे संपर्कप्रमुख असताना शिवसेनेची कामगिरी उंचावून थेट चार आमदार शिवसेनेला नांदेडमधून मिळाले. निकाल देणारे संपर्कप्रमुख अशी थोरात यांची खासियत मानली जाऊ लागली. त्यामुळेच पक्षप्रमुखांनी आजपर्यंत फारशी झेप घेता न आलेल्या धुळे, नंदुरबारची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्याचे सांगितले जाते. नंदुरबारमधील काँँग्रेसचे मातबर नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना थेट शिवसेनेत आणून नंदुरबार पालिकेवर भगवा फडकवण्याची कामगिरी केली. जिल्हा परिषदेवर सत्ता आणली. धुळे जिल्’ातही अशीच कामगिरी अपेक्षित असल्याने थोरात यांनी पदाधिकारी बदलण्यावर भर दिल्याचे म्हटले जात आहे.

धुळे शहर, धुळे ग्रामीण लक्ष्य धुळे जिल्ह्य़ांत पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील साक्री मतदारसंघ आमदार मंजुळा गावित यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या ताब्यात आला आहे. साक्री नगर पंचायतीचे सर्वेसर्वा नाना नागरे यांनाही शिवबंधनात अडकविण्यात आले. त्यामुळे साक्री शिवसेनेने सुरक्षित केला आहे. उर्वरित शिरपूर माजी मंत्री अमरिश पटेल यांचा आणि शिंदखेडा मतदारसंघ आमदार जयकुमार रावल यांचा गड मानला जातो. हे दोन्ही भाजपचे वजनदार नेते आहेत. त्यांना लक्ष्य करणे आज शिवसेनेला सोपे नाही. त्यापेक्षा धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. धुळ्यात शिवसेनेची चांगली ताकद असून धुळे ग्रामीणमधून यापूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. तेव्हा संपर्कप्रमुखांची रणनीती या दोन्ही मतदारसंघांना लक्ष्य करण्याची दिसते. खांदेपालटात जिल्हाप्रमुख पदावरून दूर करण्यात आलेल्या हिलाल माळी यांना विश्रांती दिल्याचे म्हटले जात आहे.