scorecardresearch

Premium

“शिंदे समिती बरखास्त करा”, छगन भुजबळांच्या मागणीवर जरांगे संतापले; म्हणाले, “सत्य बाहेर…”

छगन भुजबळांवर सरकराने विश्वास ठेवू नये. ते पांढरे झाल्याने त्यांचा अभ्यास कमी झाला आहे. कायदा तुम्हाला चालवायचा आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange on Chhagan Bhujbal
मनोज जरांगे काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली. गेल्या दोन महिन्यांत देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेत केली.यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“समितीचं काम संपणार नाही. कारण राज्यभर मराठा समाज आहे. मराठा समाजातील शासकीय नोंदी सापडणे आवश्यक आहे. आमच्या हक्काचं आम्हाला मिळत नाही. त्या समितीमुळेच मराठा समाजाचं आरक्षण माहित झालं. तीच त्यांची (ओबीसी नेत्यांची) पोटदुखी आहे. आमच्या समाजाच्या शासकीय नोंदी ओबीसी आरक्षणात जाणाऱ्या असूनही कशामुळे सापडायच्या नाहीत, याचं कारण काय, यांना वातावरण दुषित का करायचं आहे. ते घटनेच्या पदावर बसलेले आहेत, त्यांनी वातावरण दुषित करू नये”, असं मनोज जरांगे म्हणाले.

ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
Loksatta anyatha concepts of Litefest and Sahitya Samelan Jaipur Litefest
अन्यथा: उंटावरची ‘शहाणी’!
Jitendra Awhad slams Dhananjay Munde
‘त्यांच्या नादाला लागूनच अजित पवार बिघडले’, जितेंद्र आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका

हेही वाचा >> शिंदे समिती बरखास्त करा! छगन भुजबळ यांची मागणी; जातनिहाय जनगणनेचा आग्रह

“ओबीसी नेत्यांच्या दबावाखाली येण्याचं कारण नाही. सत्य बाहेर काढणं हे सरकारचं काम असतं. ते सत्य बाहेर निघालंच पाहिजे, त्यासाठी समितीचं काम संपू शकत नाही. त्यामुळे नोंदी शोधण्याचं काम थांबवायचं नाही, नाहीतर मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावं लागेल”, अशा इशाराही त्यांनी दिला.

तसंच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासही छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळांवर सरकराने विश्वास ठेवू नये. ते पांढरे झाल्याने त्यांचा अभ्यास कमी झाला आहे. कायदा तुम्हाला चालवायचा आहे. ही जनता तुमची आहे. ते म्हणतील तसा कायदा चालत नाही. कायदा कायद्याच्या पद्धतीने चालणार आहे. एखादी नोंद बोगस वाटली तर शासनाने शाहनिशा करावी, पण खरं असूनही डुप्लिकेट म्हणू नये, अशीही विनंती जरांगे पाटलांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dissolve the shinde committee jarange fumed at chhagan bhujbals demand said getting the truth out sgk

First published on: 27-11-2023 at 17:54 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×