सांगली : अंतर खूप आहे म्हणून शाळेपासून दुरावणार्या मुलांसाठी कुंडल येथील शरद लाड युवा प्रतिष्ठानच्यावतीने लोकवर्गणीतून तब्बल दीड हजार सायकलींचे वाटप शनिवारी केले. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी या सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी आ. शिंदे म्हणाले, स्व. जी. डी. बापूंनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेले योगदान अमूल्य आहे. याच विचारांने लाड कुटुंब आजही समाजकारणात आपले योगदान देत आहे. कार्यकर्त्यांनी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेउन देउ केलेली भेट मुलांच्या आयुष्याला आकार देणारी ठरेल असा विश्वास वाटतो.




हेही वाचा >>>सांगली : शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ, विरोधकांची समांतर सभा
यावेळी आमदार अरूण लाड यांनी सांगितले, राहत्या घरापासून शाळेचे अंतर खूप आहे या कारणामुळे अनेक मुलांच्या शाळा बंद होतात. विद्यार्थी आणि शिक्षण यात अंतर पडणार नाही याची दक्षता या उपक्रमातून घेण्यात आली याचा फायदा गरीब घरातील मुलांना निश्चितच होईल. यावेळी चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, नंदा पाटील, वैशाली मोहिते, सरपंच प्रमिला पुजारी, संचालिका अंजना सूर्यवंशी, अडिनी पाटील, अशोक विभूते, जितेंद्र पाटील, संपत सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.