भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचं शिवाजी महाराजांबाबतचं एक अजब विधान समोर आल्याने, नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटल्याचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. यावरून आता भाजपावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे भाजपावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?” असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला केला आहे. याचबोरबर “करारा जबाब मिलेगा!” असं म्हणत इशाराही दिला आहे.

हेही वाचा – “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार”; संजय राऊतांचं विधान!

प्रसाद लाड काय म्हणाले आहेत? –

राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद लाड बोलताना दिसत आहेत. ‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड करताना दिसत आहेत.

हेही वाचा – “आरे आणि कारेवाल्यानो कर्नाटक आतमध्ये घुसलं आहे, तुम्ही कधी …?” आशिष शेलारांना उद्देशून संजय राऊतांचा सवाल!

याच विधानाचा आधार घेत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do these people agree that shivaji maharaj was born in maharashtra sanjay rauts criticism of bjp msr
First published on: 04-12-2022 at 14:02 IST