अपघातात डॉक्टरचा मृत्यू

गतिरोधकामुळे शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला आपले प्राण गमवावे लागले. शनिवारी पहाटे चाळीसगाव रस्त्यावर ही घटना घडली.

गतिरोधकामुळे शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला आपले प्राण गमवावे लागले. शनिवारी पहाटे चाळीसगाव रस्त्यावर ही घटना घडली. शहरातील देवपूर परिसरातील आनंदनगरमधील रहिवासी डॉ. दिलीप रामभाऊ बोरसे (५५) हे शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मित्रासह घराकडे येत असताना दफनभूमीजवळील गतिरोधकावरून त्यांची मोटारसायकल जोरात आदळली.  मागील बाजूस बसलेले डॉ. बोरसे हे खाली पडले. डोक्याला गंभीर मार बसला.  रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doctor killed in road accident