सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनारा हा सफारी आणि डॉल्फिनसाठी प्रसिद्ध आहे. याच समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी डॉल्फिन मासे आढळले. मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात पापलेट,बोंबील नाही तर तब्बल १५ डॉल्फिन अडकले. हे डॉल्फिन मासे असल्याचं समजताच त्यांना पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. दरम्यान हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनी चिवला समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. जाळ्यात अडकलेल्या डॉल्फिन माश्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.