डोंबिवलीत एक संतापजनक घटना घडली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोपरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेलं असताना विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले आत. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही अतिशय भयंकर आणि संतापजनक घटनेने मन सुन्न झालं. राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असं फडणवीस म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं. ही अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना आहे. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत. डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला देखील सुनावलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष महिला अत्याचाऱ्याच्या घटनांवरून सरकारला कोंडीत पकडत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli gang rape case bjp devendra fadnavis first reaction gst
First published on: 23-09-2021 at 17:00 IST