scorecardresearch

Gram Panchayat Election Result 2022 : शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा; १७ ग्रामपंचायती पैकी दहा ग्रामपंचायतींवर विजय

Kolhapur Gram Panchayat Election 2022 Result : बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला पण यड्रावकर गटाच्या समर्थकानी चिवट झुंज देत विजय खेचून आणला.

Gram Panchayat Election Result 2022 : शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा; १७ ग्रामपंचायती पैकी दहा ग्रामपंचायतींवर विजय
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

शिरोळ तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या सतरा ग्रामपंचायतचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखताना काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत १७ पैकी दहा ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे. बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला पण यड्रावकर गटाच्या समर्थकानी चिवट झुंज देत विजय खेचून आणला. यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या.

आमदार राजेंद्र पाटील यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मंत्री आणि आमदारकीच्या कार्यकाळात शिरोळ तालुक्यासाठी 550 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामाची नोंद शिरोळ तालुक्याच्या जनतेने घेतली आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिरोळ तालुक्यातील गावागावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सर्व गावांचा कायापालट करू शकतात याच आत्मविश्वासाने गावागावांमधील मतदारांनी मतदान केल्याचे एकूण निकालावरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Maharashtra Vidhimandal Hiwali Adhiveshan Live Updates: “तुम्ही आमच्यावर अन्याय केला असला, तरी…”, विधानसभेत फडणवीस-अजित पवार खडाजंगी!

शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, अकिवाट, कवठेसार, उमळवाड, औरवाड, नवे दानवाड, कनवाड, संभाजीपुर, हेरवाड आणि चिंचवाड या गावांमध्ये यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळालेल्या या दैदिप्यमान यशामुळे यड्रावकर गटामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळी अधिवेशना निमित्त नागपूर येथे असलेल्या माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व विजयी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 12:53 IST

संबंधित बातम्या