सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय स्तरावर एनडीएला सर्वाधिक मते मिळाली असली तरीही महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. जागा वाटपातील वाद, त्यामुळे झालेले विलंब, प्रचाराला मिळालेला कमी अवधी यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा झाला. परिणामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच सर्वाधिक विजय झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, अशीच परिस्थिती विधानसभेत उद्भवू नये म्हणून महायुतीने आता कंबर कसली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन करून सतर्क राहण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शवंतराव चव्हाण सेंटर येथे विवेक विचार मंच आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, “लोकसभा निवडणूक झाली. त्यामध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले. खोट्या बातम्या पसरवल्या. घटना बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार अशी भीती पसरवली. एकीकडे आपल्याला सांगेन आपल्या देशाचं नाव जगात घेतलं जातंय. पूर्वी पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर युनोमध्ये जाऊन आपले (पूर्वीचे) पंतप्रधान म्हणायचे की यावर काही तरी केलं पाहिजे. पण आता पाकिस्तानने हल्ला केला तर पंतप्रधान थेट घुसके मारेंगे म्हणतात.”

sanjay raut ravindra waikar
“…तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ दिली जाणार नाही”, संजय राऊतांचं वक्तव्य
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
mns chief raj thackeray marathi news
“लावा म्हणावं…”, राज ठाकरेंची बांबू शब्दावरून संजय राऊतांनी केलेल्या विधानावर मिश्किल टिप्पणी!
Manoj Jarange
मनोज जरांगेंचं आवाहन, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात, तेव्हा…”
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

हेही वाचा >> Maharashtra News Live : “ओबीसीने कधी महाराष्ट्रात दंगली घडवल्या आहेत का?”, लक्ष्मण हाकेंचा सवाल

“मोदी हटाने वाले हट गये, मोदी तो बैठ गए. त्यांनी खोटे नरेटिव्ह पसरवले. याला तुम्ही जागृक होऊन उत्तर देणार की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. “युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू होतं. देशातील लोक तिथे अडकले होते. ते सर्व जातीपातीचे लोक होते. त्यांच्या आई वडिलांचं काय झालं असेल? आपल्या पोरांचं काय होणार याची भीती होती. हे युद्ध थांबवण्याची हिंमत कोणात होती? पण मोदींनी हे युद्ध थांबवलं. दोन तास युद्ध थांबवलं आणि आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणलं. परदेशात जाऊन हे लोक आपली बदनामी करतात. मी महायुतीमध्ये आहे, किंवा एनडीएचा घटक असलो तरीही मी एक देशभक्त म्हणून बोलतोय, या देशाचा सेवक म्हणून बोलतोय”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आता गाफील राहू नका

ते पुढे म्हणाले, “आता गाफील राहू नका. आम्हीही गाफील राहिलो. सर्व मीडिया, चॅनेलवर आकडे पाहत होतो. हे सर्व नरेटिव्ह आहे. हे खरं असतं तर काही प्रोब्लेम नाही. एवढ्या सर्व गडबडीत इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलीय. पण आपली अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्या क्रमांकावर आलीय”, असंही ते म्हणाले.