वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. आज बुलढाणा येथे आयोजित केलेल्या सभेत ते मतदारांना उद्देशून म्हणाले की, “निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनी दारू दिली तर मस्तपैकी प्यायची, कोंबड्या दिल्या तर खायच्या, बकरे दिले तरी तेही खायचे. पण कमळाला मतदान करायचं नाही.”
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “देशातली लोकशाही वाचली पाहीजे असं तुम्हाला वाटत असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका पण त्यांना मत देऊ नका. असे म्हणत आंबेडकर यांनी मतदारांना कोणाला मतदान करायचं याबाबत सल्ला दिला. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने नुकतीच शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे) युती केली आहे. हे दोन पक्ष आगामी निवडणुकांमध्ये एकत्र दिसतील.”
हे ही वाचा >> “टायगर अभी जिंदा हैं!” मुंबई मनपा निवडणुकीआधी मनसेचं नवं स्फूर्तीगीत, पाहा टीझर
…तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही
बुलढाणा येथील सभेत आंबेडकर यांनी मुस्लीम समजाला भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर म्हणाले की, “मला १०० टक्के खात्री आहे की मुस्लीम मतदार कमळाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी आत्ता मतदान केलं, तर गावागावात गोध्रा जळीतकांड झाल्याशिवाय राहणार नाही.”