डॉ. जया द्वादशीवार वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

शर्वरी पेठकर, माधवी भट, डॉ पद्मरेखा धनकर, डॉ अरूणा सबाने मानकरी

Dr Jaya Dwadashiwar Literary Award
कवितांसाठी डॉ.पद्मरेखा धनकर यांना तर वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरूणा सबाने यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

ज्येष्ठ लेखिका तथा समिक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये साहित्यिक शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी तर नाट्य लेखनासाठी माधवी भट, कवितांसाठी डॉ.पद्मरेखा धनकर यांना तर वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरूणा सबाने यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

ज्येष्ठ लेखिका, इंग्रजीच्या प्राध्यापिका तथा समिक्षक डॉ. जया व्दादशीवार यांच्या निधनानंतर दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून पुरस्कार वितरीत केले जातात.

यावर्षी डॉ. जया व्दादशीवार यांचे निवासस्थान असलेल्या भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथे २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्याच हस्ते वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr jaya dwadashiwar literary award announced msr

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी