सोलापूर : पुण्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अखेर त्यांची वर्णी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी लावण्यात आली आहे. डॉ. ठाकूर हे सोलापुरात यापूर्वी चार वर्षे अधिष्ठातापदावर कार्यरत असताना काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरले होते.

हेही वाचा >>> माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खून प्रकरणी संशयिताला कागलमधून अटक

arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
dharmarao baba atram
तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…
Nana Patole Criticizes mahayuti Government over Ladki Bahin Yojana, Congress, Nana Patole, Congress State President Nana Patole, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024, Election Gimmick, marathi news,
“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका
Narmada Bachao Andolan Medha Patkar sentenced to 5 month jail term in defamation case
मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास; आंदोलने, उपोषणे, कारावास आणि संघर्ष; कशी होती ‘नर्मदा बचाव’ची ३९ वर्षे?
uttar pradesh stampede at religious event
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश
girlfriend genitals cut news
धक्कादायक! ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने महिलेचं क्रूर कृत्य, प्रियकराचे गुप्तांग कापून…
Gosekhurd, Bhandara, protest,
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध, काँग्रेसने दाखवले काळे झेंडे
aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट

ससून रूग्णालय अर्थात बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असताना रूग्णालयात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपींना साह्य केल्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्यात डॉ. ठाकूर हे अडचणीत आले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना  शासनाच्या १० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अधिष्ठातापदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. तर इकडे सोलापुरात  डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे गेल्या १३ फेब्रुवारी रोजी अधिष्ठातापदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. 

तथापि, डॉ. संजीव ठाकूर हे आपला पुण्यातील पदभार काढून घेतल्याच्या विरोधात मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॕट) धाव घेतली होती. त्यावर निकाल प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणापुढील मूळ अर्जावर होणा-या आदेशाला आधीन राहून डॉ. ठाकूर यांची सोलापुरात  डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी पाठविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला आहे.