तुंबलेले गटार साफ करताना विषारी वायूमुळे गुदमरून सफाई कामगाराचा मृत्यू

शहरात पश्चिम मंगळवार पेठेतील बुधले गल्ली येथे तुंबलेल्या भूमिगत गटारीची साफसफाई करण्यासाठी गटारीत उतरलेल्या सफाई कामगाराचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला.

शहरात पश्चिम मंगळवार पेठेतील बुधले गल्ली येथे तुंबलेल्या भूमिगत गटारीची साफसफाई करण्यासाठी गटारीत उतरलेल्या सफाई कामगाराचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेच्या निमित्ताने गटारींच्या साफसफाईसाठी आवश्यक साधनांचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
अर्जुन सिद्राम सुरवसे (४५, रा. शेळगी, सोलापूर) असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. बुधले गल्लीत रस्त्यावरील सार्वजनिक भूमिगत गटारी तुंबल्याची तक्रार प्राप्त झाल्याने पालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयातून सफाई कामगार सुरवसे हा गटारीची साफसफाई करण्यासाठी आला होता. गटारीत उतरून साफसफाई करताना विषारी वायूमुळे सुरवसे हा गुदमरून गटारीत कोसळला. त्याला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याने प्राण सोडले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drainage cleaning worker died due to toxic gas

ताज्या बातम्या