सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे लोकांचं मनोरंजन तर होतंच, त्याचबरोबर अनेकांना यामुळे लोकांपर्यंत पोहचून प्रसिद्धीही मिळवता येते. सध्या सोशल मीडियावर रील्सचं प्रमाणही वाढत चाललं आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अगदी कमी वेळात म्हणजेच अवघ्या १५ ते ३० सेकंदामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये अनेक विनोदी, माहितीपूर्ण व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रील्समुळे अनेकांना एक ओळख प्राप्त झाली आहे. यामध्ये केवळ सामान्य माणसंच नाही, तर शासकीय मंडळांमध्ये काम करणारे लोकही या रील्स बनवण्यात आघाडीवर आहेत. मात्र, एका महिला कंडक्टरला गणवेश घालून रील्स बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेचे नाव मंगल सागर गिरी असे असून महामंडळाने या महिलेवर कडक कारवाई केली आहे. या महिलेला मंडळाने निलंबित केले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप मंगलवर करण्यात आला आहे.

विधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू! सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय

मंगल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर एक लाख फॉलोवर्स आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे रील्स शेयर करत असून तिचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतात. तिने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओही व्हायरल झाला आहे. याच व्हिडीओवर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मंगलने एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर मंडळाने मंगलवर कारवाई करत तिला निलंबित केले आहे. इतकंच नाही तर हे व्हिडीओ शूट करणाऱ्या वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार यांना एसटी महामंडळाने निलंबित केले आहे.

यानंतर मंगलनेही महामंडळावर आरोप करत ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं आहे. अशा रील्स बनवणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे. दरम्यान, मंगलवर कारवाई झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dressing in uniform and making reels costs lady conductors suspension action was taken by st corporation pvp
First published on: 04-10-2022 at 16:38 IST