scorecardresearch

साताऱ्यात ५८८ वाहनचालकांना नियमभंगाबद्दल ६५ लाखांचा दंड

साताऱ्यात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५८८ वाहन चालकांवर कारवाई करून पासष्ट लाख रुपये दंड सातारा वाहतूक शाखेकडून वसूल करण्यात आला.

(संग्रहीत छायाचित्र)

वाई : साताऱ्यात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५८८ वाहन चालकांवर कारवाई करून पासष्ट लाख रुपये दंड सातारा वाहतूक शाखेकडून वसूल करण्यात आला. वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठय़ा प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, महामार्गावर दुचाकी वाहन चालवित असताना हेल्मेटचा वापर न करणे, तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करऐ. अशा ५८८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून या मोटार चालकांचा परवाना निलंबित करण्यात आले. या नंतर लोकआदालतीमध्ये या वाहन चालकांनी पासष्ट लाख रुपये तडजोड शुल्क भरले आहे.

वाहनांच्या विक्रेत्यांनी वाहनांची नोंदणी वेळेत करून त्यानंतरच वाहन मालकांचे ताब्यात द्यावे. वाहन चालकांनी आपल्या वाहनास विहीत नमुन्यातील नंबर प्लेट बसवावी. विशेष करून नंबरप्लेट विक्रेत्यांनी फॅन्सी नंबरप्लेट बनवून देऊ नयेत, त्याचप्रमाणे वाहन चालकांनी वाहन चालविताना मोबाईल संभाषण टाळावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, हेल्मेटचा व सिट बेल्टचा वापर नेहमी करावा. कर्णकर्कश हॉर्नचा वापर टाळावा. गाडीच्या, बुलेटच्या सायलेन्सरच्या पुंगळय़ा काढून वाहन चालवू नये. पालकांनी आपल्या पाल्यास परवाना असल्याशिवाय वाहन चालविण्यास देऊ नये. वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक नियंत्रण शाखेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drivers fined violating rules satara traffic violation motor vehicle law ysh