सांगली : पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून खानापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करावेत अशी मागणी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेउन गुरूवारी केली.
पावसाने दडी मारल्याने खानापूरसह आटपाडी तालुक्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. चाराच उपलब्ध नसल्याने पशूधन संकटात सापडले आहे. तरी शासनाने चारा डेपो अथवा चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांना शिष्ट मंडळाने दिले असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.या शिष्टमंडळामध्ये सचिन शिंदे, संजय मोहिते, अविनाश चोथे, प्रशांत सावंत, विनोद पाटील आदींचा समावेश होता.