Premium

सांगली: पावसाअभावी खानापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर

पावसाने दडी मारल्याने खानापूरसह आटपाडी तालुक्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. चाराच उपलब्ध नसल्याने पशूधन संकटात सापडले आहे.

drought ,Drought declared in Khanapur , lack of rain in sangli , rain, Drought ,
सांगली: पावसाअभावी खानापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर

सांगली : पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून खानापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करावेत अशी मागणी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेउन गुरूवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाने दडी मारल्याने खानापूरसह आटपाडी तालुक्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. चाराच उपलब्ध नसल्याने पशूधन संकटात सापडले आहे. तरी शासनाने चारा डेपो अथवा चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांना शिष्ट मंडळाने दिले असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.या शिष्टमंडळामध्ये सचिन शिंदे, संजय मोहिते, अविनाश चोथे, प्रशांत सावंत, विनोद पाटील आदींचा समावेश होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drought declared in khanapur taluka due to lack of rain sangli amy

First published on: 21-09-2023 at 18:57 IST
Next Story
Gauri Avahana 2023 सोलापूर : मुस्लीम कुटुंबीयांच्या घरी गौरीचा पाहुणचार