माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा, या मागणीसाठी एका तरुण दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. त्याने मोबाईल टॉवरवर चढून तब्बल ४ तास धिंगाणा घातला. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडलीय. गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

गणपत बकाल हा दारूच्या नशेत संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर चढला. टॉवरवर चढून तो त्याच्या माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्याची मागणी गावकऱ्यांकडे करू लागला. गावातील लोकांनी त्याला समजावलं आणि टॉवरवरून खाली उतरण्यास सांगितलं. पण त्याने ऐकलं नाही. तो घरकुल पाहिजे, अशीही मागणी करू लागला.

व्हिडीओ पाहा :

तरुण ऐकत नसल्याचं पाहून अखेर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न केले, पण त्यांनाही यश आलं नाही. शेवटी अग्नीशमन दलाच्या पथकाला बोलावण्यात आलं. त्यांनीही या तरुणाला खाली उतरवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते हतबल झाले तरी हा तरुण मात्र, टॉवरवरून खाली आला नाही.

हेही वाचा : VIDEO: नदीतील पाणी पिल्यानंतर दोन दिवसात रुग्णालयात दाखल, पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचा व्हिडीओ व्हायरल

शेवटी ४ तास गोंधळ घातल्यानंतर तो स्वतःच खाली उतरला. त्यांनतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.